जळगाव- Jalgaon

जिल्ह्यासह पुणे, धुळे, हडपसर, कल्याण, कराड अशाप्रकारे राज्यभरात धुमस्टाईल सोनसाखळी लांबविणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी रा. प्रजापत नगर व अमोल उर्फ रामेश्वर राजेंद्र अहिरे रा. विठ्ठलपेठ, गोपाळपूरा जळगाव यांच्यासह चोरीचे सोने खरेदी करणारा दिपक शिवराम भडांगे रा. ज्ञानदेव नगर, श्रावण कॉलनी जळगाव या तिघांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात सोनसाखळी चोरीचे ३० गुन्हे प्रलंबित होते. यात आणखी गुन्हयांची भर पडत होती. विशेष पोलीस महानिरिक्षकांकडून यांची गंभीर दखल घेण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा गेल्या दोन महिन्यांपासून कामाला लागली होती. या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणचे १८ गुन्हे

उघडकीस आणून ६ लाख २५ हजारांचे १३९ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. अशी माहिती आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.