सोमवारपासून गोलाणी मार्केट खुले होणार
जळगाव

सोमवारपासून गोलाणी मार्केट खुले होणार

नियमांचे पालन करा, गर्दी करू नका-पालकमंत्री

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

नागरिक व व्यापार्‍यांच्या मागणीनुसार गोलाणी मार्केट सोमवारपासून सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत काउंटर सेलसाठी खुले होणार आहे. नागरिकांनी गर्दीचा उद्रेक टाळून खरेदी करावी. तसेच शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, आयुक्तांनी सूक्ष्म नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करावी आणि दुकानदार, व्यापार्‍यांनी सुरक्षित अंतर ठेवून शासनाचे सर्व बंधने पाळून विक्री करावी, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, शहरातील मार्केट भागात कोरोेना बाधित रुग्ण आढळल्यास तो भाग त्वरित सील करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com