मुलीच्या भेटीसाठी बडोदा येथे जाणारे पिता अपघातात ठार

जळगावातील स्वामी ट्रॅव्हल्सचा बडोद्यानजीक अपघात
मुलीच्या भेटीसाठी  बडोदा येथे जाणारे
पिता अपघातात ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील स्वामी ट्रॅव्हल्सद्वारे (Swami Travels) बडोदा (Baroda) येथील मुलीच्या भेटीसाठी (visit the girl) जात असलेल्या पित्याचा (Father killed) बडोद्यानजीक ट्रॅव्हलच्या झालेल्या अपघातात (accident) मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. समाधान हरी सुरडकर (वय 58,रा.फत्तेपूर,ता.जामनेर) असे मयताचे नाव आहे. ट्रॅव्हल्सच्या समोर धावणार्‍या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रॅव्हल्स समोरील वाहनावर धडकल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील समाधान सुरडकर यांची मुलगी मनीषा गौतम सोनवणे ही बदोड्यात राहते. जावई गौतम सोनवणे यांचा तीन महिन्यांपूर्वी कोरोनाने बडोद्यात मृत्यू झाला. जावई गौतम सोनवणे यांच्या मृत्यूसंबंधाची कागदपत्रे मुलगी मनिषाकडे द्यावयाचे होते. ते कागदपत्र देण्यासाठी समाधान सुरडकर हे रविवारी रात्री जळगावातून जी.जे.05 बी.टी.0222 या क्रमांकाच्या स्वामी ट्रॅव्हल्सने बडोद्याकडे जात होते. सुरडकर हे कॅबीनमध्ये बसले होते. सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बडोद्याजवळ पुढे चालणार्‍या वाहनाने अचानक बे्रक दाबल्याने ट्रॅव्हल्स संबंधित वाहनावर धडकली. तर मागून येणारे वाहनानेही टॅ्रव्हलला जोरदार धडक दिली. या अपघातात सुरडकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर यात चालक कन्नुभाई पटेल (रा.अहमदाबाद) हा बचावला. अपघात एवढा जोरदार होता की, ट्रॅव्हलच्या कॅबीनचा जागेवरच चुराडा झाला होता. सुरडकर हे मुळ शेवगा पिंप्री, ता.जामनेर येथील रहिवाशी होते. सुरडकर यांच्या पश्चात पत्नी आशा, मुलगा विशाल व विधवा मुलगी मनिषा असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.