एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील गोडावूनला आग

एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील गोडावूनला आग

आगीत गोडावूनमधील लाकडे जळून खाक; दोन बंबांनी आणली आग आटोक्यात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील आदर्श इंडस्ट्रिजच्या गोडावूनमधील लाकडाला आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

या आगीत लाकडे जळून खाक झाली असून मनपाच्या अग्निशमनाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली.

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील आदर्श इंडस्ट्रिज नावाची कंपनी आहे. या कंपनीचे शेजारीच गोडावून असून याठिकाणी लाकडे ठेवण्यात आली होती.

शुक्रवारी सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास अचानक या लाकडांना आग लागली. आगीने अवघ्या काही मिनिटातच रौद्ररुप धारण केल्याने आकाशात आगीचे लोळ उठत होते.

दरम्यान आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी देविदास सुरवाडे, रोहीदास चौधरी, भगवान पाटील, हिरामण चौधरी, भगवान पाटील, वसंत कोळी, संतोष तायडे, नितीन बारी यांनी दोन बंबांनी पाण्याचा मारा करुन ही आग आटोक्यात आणली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com