चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यात सर्रासपणे अवैद्य वाळू, गावठी दारु, जुगार क्लब, गुटखा आदि दोन नबंर धंदे चालू आहेत. याबाबत मी वेळोवेळी पोलिसांसह मंत्र्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतू त्याची दखल घेतली गेली नाही, आता मी स्वता; गुटख्याचा लाखो रुपये किमतीचा ट्रक पकडून दिला आहे. परंतू तरी देखील माझी फिर्याद घेतली गेली नाही, त्यामुळे गुटखा तस्करीप्रकरणी पोलिसांचे गोडबंगाल दिसून येत असून ट्रक सोडून देणार्या तसेच यासंबंधीत पोलिसांची आधिकार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी पत्रपरिषदेत आमदार मगेश चव्हाण यांनी केली.

शहरातील आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात रविवारी (दि,१८) दुपारी ३ वाजता पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍड.धनंजय ठोके, जि.प.सदस्य पोपट भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम, नगरसेवक नितीन पाटील, जितेंद्र वाघ आदि उपस्थित होते.

पुढे माहिती देतांना आ.मंगेश चव्हाण म्हणाले की, पोलीस हे कायद्याचे गैरवापर करीत असल्यामुळे तालुक्यात दोन नंबर धंदे वाढले आहेत. मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर व राज्यात बंदी असलेला गुटख्याची विल्हेवाट लावणे, पुराव नष्ट करणे या उद्देशाने बेकायदेशीर वाहतू केल्याप्रकरणी ट्रक चालक, मालक, गुटखा ज्याठिकाणाहून आला, ज्या ठिकाणी पोहचार होतो ते सर्व संबंधीत, तसेच त्याच सहकार्य करणारे सर्व संबंधीत गुन्हे अन्वेषण शाखा व मेहुबारे पोलीस स्टेशन प्रभारी आधिकारी सचिन बैद्र व कर्मचारी यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करा, पोलिसांनी फक्त लाखो रुपयांच्या गुटख्या प्रकरणी ट्रक चालक व क्लिनरवर गुन्हा दाखल केला आहे. परंतू खरे आरोपी गुटख्याची तस्करी करणार मुळ व्यापारी व पोलिस आधिकारी आहेत.