बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव

माहेश्वरी सभेचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप
बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्थ झाली आहे. यात काही रुग्णांचे नातेवाईक मृत्यू झालेल्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासह त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे टाळतात. त्यामुळे अशा बेवारस मृतदेहांवर नेरीनाका स्मशानभूमीत काही विद्यार्थी निस्वार्थ भावनेने अंत्यसंस्कार करत आहे. या विद्यार्थ्यांचा माहेश्वरी सभेतर्फे गो-शाळेत गौरव करण्यात आला.

करोनाच्या कालावधीत अनेक रुग्णांच्या मदतीला भीतीपोटी कोणीही येत नाही.त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न उपस्थित होतो.

अशा बेवारस 100 पेक्षा जास्त प्रेतांवर मूळजी जेठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मुकेश पाटील, विकास वाघ, अमोल बावणे, कृष्णा साळवे, मुकेश सावकारे, करण मालकर हे 21 मार्चपासून मोठी जोखीम पत्करुन अंत्यसंस्कार करीत आहेत.

या विद्यार्थ्यांची समाजसेवा लक्षात घेता माहेश्वरी सभेतर्फे त्यांचा सत्कार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्याम कोगटा, माहेश्वरी सभेचे शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक मान्यवरांनी केले.

सामाजिक कार्यासाठी नेहमी सहकार्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले. तसेच गोशाळेतील गायींना चारा खाऊ घालण्यात आला. यावेळी संगीता कलंत्री, जगदीश जाखेटे, अ‍ॅड.राहुल झंवर, विनोद न्याती, बी.जे.लाठी, अ‍ॅड.दीपक फाफट, मनीष लढ्ढा, सतीश तोष्णीवाल, ममता लढ्ढा, सिमरन कलंत्री, चिन्मय कलंत्री आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com