बालिकेचे अपहरण ; तरुणासह चार जणांना अटक

बालिकेचे अपहरण ; तरुणासह चार जणांना अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बोदवड तालुक्यातील पाचदेवळी शिवारातील एका शेतमजुराच्या घरातून त्याच्या 12 वर्षीय मुलीचे अपहरण करणारा तरुण आणि त्याला मदत करणारे तीन नातेवाईक अशा एकूण चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

या बालिकेचे अपहरण 9 जुलै रोजी झाले. तिच्या कुटुंबीयांनी पाच दिवस शोध घेतला. परंतु, ती बालिका सापडली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी 13 रोजी दुपारी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत वरणगाव येथील पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांना माहिती दिली.

यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम आणि वरणगाव येथील पोलीस निरीक्षक बोरसे यांना तपासकामी पथके स्थापन करण्याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. हे पथके बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, तसेच मध्यप्रदेशात पाठवण्यात आले होते.

बोदवडला सापडली बालिका

या घटनेतील बालिका बोदवड येथे राहुल जानकीराम धुलकर (वय 18, रा.साळसिंगी, ता.बोदवड) याच्या सोबत 15 रोजी आढळली. त्यास पोलिसांनी अटक केली.

या बालिकेचे अपहरण करणार्‍या राहुल धुलकर यास मदत करणारे त्याचे नातेवाईक लताबाई जानकीराम धुलकर, योगेश जानकीराम धुलकर (रा.साळशिंगी), डिगंबर अशोक सोनवणे (भिलवाडी, ता.बोदवड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com