तापी नदी पात्रात बुडून बालिकेचा मृत्यू

सात तासांचे शोध कार्य : शिक्षकाने वाचविले बालकाचे प्राण : झेडटीसी परिसरात शोककळा
तापी नदी पात्रात बुडून बालिकेचा मृत्यू

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

शहरातील झेडटीएस परिसरातील तापी नदीवर (Tapi river) असलेल्या रेल्वे पुलाजवळ (railway bridge )सायकल घेऊन गेलेल्या बहिण भावापैकी 11 वर्षिय बहिणीचा तापी नदी पात्रात बुडून मृत्यू (Drowning death) झाला तर 12 वर्षिय भावाला वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने झेडटीसी परिसरात शोककळा पसरली. बालिका नदी पात्रात बुडाल्यानंतर जवळपास 7 तास तीचा नदी पात्रात शोध घेण्यात आला त्यांनतर सायंकाळच्या सुमारास तीचा मृतदेह (Corpses) नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथिल झेडटीएस परिसरातील रहिवासी मनीषकुमार यादव (रा. आर.बी. 3 इन्ट्रक्टर कॉलनी, ब्लू स्टार नव दुर्गा मंडळाजळ, झेडटीएस) यांची अनन्या (11वर्ष) व आर्यन (12 वर्ष) ही मुले सायकल फिरवत रेल्वे मार्गाने तापी नदीवरील रेल्वे पुलाजवळ पोहचले होते. यावेळी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नदी पात्रात दीड दिवसाचा गपणती बुडविण्यासाठी काही भाविक नदी पात्रातत आले होते. यावेळी हे दोघे बहिणभाऊ नदी पात्रात उतरले होते. यावेळी किणार्‍यावरुन अनन्या हिचा पाय घसरला. यावेळी तीने मदतीसाठी भाऊ आर्यनला हात दिला. त्यानेही तीला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्रा पाणी जास्त असल्यामुळे ते दोघेही पाण्यात गटांगळ्या खात असतांना जवळच असलेल्या भाविकांच्या लक्षात हा प्रकार आला.

बहिण भाऊ बुडाले - दोेघे बहिण-भाऊ पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येतात येथिल श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाचे शिक्षक निवृत्ती नथ्थू पाचपांडे (वय 57) यांनी तात्काळ नदी पात्रात उतरत दोघांना वाचविण्याचे प्रयत्न केला मात्र केवळ आदित्यलाच वाचविण्यात यश आले. मात्र यावेळी अनन्या मात्र आढळून आली नाही.

सात तासांचे प्रयत्न - यानंतर आपत्ती व्यवस्थापन समिती व तालुका पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी पो.नि. विलास शेंडे, एपीआय रुपाली चव्हाण, एएसआय श्यामकुमार मोरे, हे. कॉ. प्रेम सपकाळे पो.काँ. जितेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतले. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने नदी पात्रात अनन्याचा शोध घेतला असता जवळ पास सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी 5 वाजता तिचा मृतदेह आढळून आला. दरम्यान अनन्याच्या पश्चात आई, वडील, आर्यनसह अन्य एका भाऊ असा परिवार आहे.अनन्या व आर्यन येथिल रेल्वे स्कुलमध्ये 6 वीच्या वर्गात शिक्षण घेत होते. या घटनेनंतर झेडटीएस परिसरात शोककळा परसली आहे.

शिक्षक ठरले देवदूत - दरम्यान, दोघे बालके नदी पात्राकडे जात असतांनना संत गाडगेमहराज हिंदी विद्यालयातील शिक्षक निवृत्ती पाचपांडे यांनी या दोघांना कुठे जात आहे याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर पाचपांडे गणपती विसर्जनासाठी नदी पात्राकडे रवाना झाले होते.

दरम्यान याबाबत, तालुका पोलिसात मनीषकुमार यादव यांच्या खबरीवरुन अ.मृ. रजि. 29/21, नोंद करण्यात आली. यात अनन्याच्या डोक्याला जखम झाली असल्यामुळे दवाखान्यात उपचारासाठी दोघे बहिण- भाऊ गेले होते. त्यानंतर बर्‍याच वेळानंतर मुलगी पाण्यात बुडाल्याची चर्चा समजले. यानंतर घटनास्थळी गेल्यानंतर आर्यन कडून तीचा पाय घसरुन मृत्यू झाल्याचे समजल्याचे खबरीमध्ये नमुद करण्यात आले आहे. तपास पो.नि. विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. प्रेमचंद सपकाळे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com