पारोळा : शॉक लागून बालिकेचा मृत्यू
जळगाव

पारोळा : शॉक लागून बालिकेचा मृत्यू

तालुक्यातील टोळी येथील घटना

Rajendra Patil

पारोळा - प्रतिनिधी - Parola

तालुक्यातील टोळी येथील भूमिका भारत पाटील (वय 12) वर्ष ही आज दि.16 रोजी दुपारी टोळी शिवारातील शेतात जात असतांना रस्त्यात भास्कर उत्तम पाटील यांच्या शेतात इलेक्ट्रिक खांबावरील मेन लाईनचा तार तुटून पडलेला होता त्या तारेवर त्या बालिकेचा पाय पडून तिला शॉक लागून जागीच मरण पावली.

तिला नातेवाईकांनी पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तीस डॉ.योगेश साळुंखे यांनी तपासून मयत घोषित केले.

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात भूषण राजमल पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास आशिष चौधरी हे करीत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com