विद्यार्थ्यांना आता तांदुळऐवजी बँक खात्यात थेट पैसे मिळणार

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्वावर डीबीटी योजनेची अंमलबजावणी
विद्यार्थ्यांना आता तांदुळऐवजी बँक खात्यात थेट पैसे मिळणार
Jalgaon ZP

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोना महामारीच्या कठीण काळात शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सन 2021 च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ विद्यार्थ्यांना तांदूळ व धान्यादी माल वाटप न करता डिबीटी योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात 15 तालुके असून पहिली ते पाचवीचे 2 लाख 75 हजार 995 विद्यार्थी तर सहावी ते आठवीचे 1 लाख 75 हजार 648 विद्यार्थी असे एकूण 4 लाख 66 हजार 573 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी योजनेचा लाभ मिळणार आहे.

करोनाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना शिजविलेले अन्न न देता रोख रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेतील मुख्याध्यापकामार्फत पालक-विद्याथ्यार्र्ंचे संयुक्त बँक खाते उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्याथ्यांचे आधारलिंक बँक खाते अद्ययावत झाल्यानंतर शासन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करतील.

भाऊसाहेब अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी,जि.प.जळगाव

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013(एनएफएसए) अंतर्गत देशातील सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा 5 किलो प्रतिलाभार्थी अन्नधान्याचे वेगवेगळ्या योजनांद्वारे वितरण करण्याचे जाहीर केले आहे.

केंद्र शासनाच्या मोफत धान्य देण्याच्या तरतुदीचा एक भाग म्हणून शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सन 2021 च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रक्कमेइतके आर्थिक सहाय्य थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शासन निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व लाभार्थ्यांचे आधारलिंक बँक खाते माहिती विहित नमुन्यात अद्ययावत करुन तयार ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते अद्यापी उघडण्यात आलेले नाही. अशा विद्यार्थ्यांचे आधारलिंक बँक खाते उघडण्याबाबत मुख्याध्यापकांमार्फत पालकांना देण्यात आले आहेत. 9 जुलैपर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्यावत करुन जिल्हास्तरावर जतन करण्यात यावी, जेणेकरुन शासनस्तरावर पुढील निर्देश प्राप्त होताच उचित कार्यवाही करण्यासाठी ही माहिती उपलब्ध करुन देणे शक्य होईल.

बँक खाते उघडण्यासाठी शाळेने संबंधित पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

प्रायोगिक तत्वावर योजना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सन 2021 मधील उन्हाळी सुट्टीच्या कालावधित थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात बँकेमार्फत शालेय पोषण आहार प्रत्यक्षात न देता विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरित करण्याबाबत शासनाची योजना आहे. शालेय पोषण आहार जेवढ्या रुपयांचा प्रति विद्यार्थी दिला जातो.

तेवढी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात शासन प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवत आहे. शालेय पोषण आहार प्रतिविद्यार्थी एका दिवसाला इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 150 ते 160 तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 240 ते 260 याप्रमाणे रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम शासन वर्ग करणार आहेत. त्यासाठी 9 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारलिंक बँक खाते जोडणे गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com