आदिवासी बांधवांना रेमेडेसीवीर मिळणार मोफत

न्युक्लिअस बजेट अंतर्गत उपलब्ध;लोक संघर्ष मोर्चाच्या पाठपुराव्याला यश
आदिवासी बांधवांना रेमेडेसीवीर मिळणार मोफत

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अतिशय गंभीर परिस्थिती आहे या दुसर्‍या लाटेने आदिवासी क्षेत्रातही आता शिरकाव झाला आहे.

आदिवासी बांधव उपचारापासून वंचित राहू नये लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान, राज्यातील अनुसूचित जमातीच्या नागरीकांना न्युक्लियस बजेट अंतर्गत रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी येणारा खर्च उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला आहे.त्याबाबतचे आदेश देखील निर्गमित करण्यात आले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. शासकीय व खाजगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत .आदिवासी बांधवांना वेळेवर उपचार मिळावा तसेच त्यांना रेनेडिसिव्हीर इंजेक्शन केवळ पैशांअभावी वंचित राहावे असे होता कामा नये म्हणून,

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने करोना विषाणूच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील अनुसूचित जमातीच्या नागरीकांना न्युक्लियस बजेट अंतर्गत रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी येणारा खर्च उपलब्ध करुन देण्याबाबतची मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,आदिवासी मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्याकडे केली होती.

त्यानुसार अनुसूचित जमातीच्या नागरीकांना न्युक्लियस बजेट अंतर्गत रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी येणारा खर्च उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला आहे.

असे आहेत निकष

या निर्णयामुळे खाजगी रुग्णालयात दाखल आदिवासी कोरोनाबाधित रुग्णाला जर या इंजेक्शनची गरज असेल तर त्याला तातडीने त्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून सदर निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

यासाठी रुग्ण हा खाजगी रुग्णालयात दाखल हवा तसेच रुग्णालय हे म. फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत नसावे.

रुग्ण हा अनुसूचित जमातीचा असावा तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. या सारखे निकष या साठी लागू असून यात आदिम जमाती,दारिद्र्य रेषेखालील, विधवा, परित्यक्ता, अपंग निराधार यांना प्राधान्य देण्यात येईल असेही आदेशात नमूद केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com