भुसावळ - प्रतिनिधी bhusawal

शहरातील जळगाव रोडवरील काही भाग हा तालुक्यातील साकेगाव ग्रा.पं. अंतर्गत येतो. मात्र या परिसरात मागील १५ वर्षांपासून ग्रा.पं. कडून मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे त्या मिळण्याची मागणी नागरिकांनी ग्रा.पं.कडे निवेदनाद्वारे केली आहे.

भुसावळ शहरातील मात्र साकेगाव ग्रा.पं. अंतर्गत येणार्या लाईफ केअर हॉस्पिटल समोरील भाग्यश्री विहार, साई विहार, स्वामी नारायण नगर, भागातील रहिवाशांना मागील १५ वर्षांपासून रस्त्याचे योग्य काम झालेले नाही. क्रॉँक्रीटीकरण नाही, अमृत योजनेच्या पाण्याचा लाभा मिळणे, नाल्यांची सफाई होत नाही. घंटा गाड्या नाही. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पथदिवे नाही, रस्त्यांवर खड्डे पडले आहे. यासह मुलभुत सुविधा मिळत नसल्याची या परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. याबाबत साकेगाव ग्रा.पं. ला कॉंग्रेस सेवा फाउंडेशच्या शहराध्यक्षा मिनाक्षी जावरे यांनी वारंवार निवेदने सादर करण्यात आली आहे. मात्र अद्यापही ग्रा.पं.ने मुलभूत सुविधा दिलेल्या नसल्यामुळे नागरिकांमधून नराजी वाढतांना दिसत आहे.तरी ग्रा.पं. प्रशासनाने यासुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

याबाबत शहराध्यक्षा मिनाक्षी जावरे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर के. आर. भंगाळे, ज्योती कांवळे, सरोज कावळे, स्वामी बावस्कर, निशा घुले, अशोक कोंगे, पुष्पा बोरोले, शिल्पा बोरोले, स्वप्नील कोंगे, लक्ष्मी कोळी, प्रमोद धांडे, रमेश बावस्कर यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.