सोन पावलांनी गौरींचे उत्साहात आगमन

सोन पावलांनी गौरींचे उत्साहात आगमन

आज गौरींचे पूजन : उद्या विसर्जन

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

बाप्पांचे आगमना पाठोपाठ रविवारी ज्येष्ठा गौरींचेही (Gauri's) घरोघरी सोनपावलांनी (golden steps) चाकरमान्यांच्या उपस्थितीत आगमन (arrival) झाल्याने परिवार गोकुळात भक्तीरंगात (In devotion) सर्व भाविकांनी गणपती बाप्पांसह ज्येष्ठा - कनिष्ठा गौरींना कोरोना आजारापासून सगळ्यांची सुटका करा, अशी प्रार्थना केली.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भाव असल्याने गेल्यावर्षी बाहेरगावी नोकरी- व्यवसाय करणा-यांना या सणांच्या काळात देखील गावी येता आले नव्हते, परंतु कोरोनाबाबत शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच लसीकरण उपाययोजनांमुळे यंदा चाकरमानी मंडळी गणपती बाप्पा व ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त गावी आलेली असल्याने घरांचे रूपांतर गोकुळात झाल्याचे चित्र दिसले.

आज ज्येष्ठा गौरींचे पूजन केले जाणार आहे. यासाठी नैवेद्यात 16 भाज्या असून त्यात गवार, भेंडी, दोडके, गिलके चाकी, गंगाफळ, तोडले, चाकवद, सुरण, आंबटचुका, वाल, वटाणे, भोपळा, काकडी, बटाटे व पडवळीचे महत्त्व असते. तसेच सांजोर्‍या, करंजी, लाडू, पुरणपोळी, अंबील यासह पंचामृताचा समावेश असतो. काही ठिकाणी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढीत मनमोहक सजावट करित आकर्षक उभ्या गौरी तसेच चौरंगावर मुखवटे ठेवीत आरास केलेली दिसून आली. उद्या मंगळवारी ज्येष्ठा गौरींचे विसर्जन केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com