गौराईंचे आज सोनपावलांनी आगमन

गौराईंचे आज सोनपावलांनी आगमन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गणरायाचे आगमन झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी गौरींचे आगमन (Gauri's arrival) होत असते. उद्या रविवारी गौरांईंचे सोनपावलांनी आगमन (Arrival by Sonpaval) होणार आहे. गौराईंच्या स्वागताची (Welcome) तयारी झाली असून महिलांकडून नैवेद्यासाठी लागणारे पदार्थ देखील तयार करण्यात आले आहे.

गणरायापाठोपाठ रविवारी 12 रोजी गौराईंचे आगमन होत आहे. महिलांसह घरातील प्रत्येक व्यक्तीकडून गौराईंचे स्वागताची संपुर्ण तयारी केली जात असून देखाव्यांच्या सजावटीसह महिलावर्गाकडून फराळ तयार केले जात आहे. गौराईंचा तीन दिवसांचा उत्सव म्हणजेच पर्वणीच असते.

पहिल्या दिवशी गौराईंचे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत होणार असून दुसर्‍या दिवशी त्यांचे विधीवत पुजन केले जाते तर तिसर्‍या दिवशी म्हणजेच भाद्रपत शुक्ल अष्टमीला भक्तीमय वातावरणात विसर्जन होत असते. प्रत्येक ठिकाणी गौराईंचे स्थापना करण्याची वेगवेगळी प्रथा असल्याने त्यानुसार त्यांची स्थापना केली जात असते.

खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

गौरींच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. यामध्ये साड्या, दागिने, पुजेचे साहित्य, फळे, फुले यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

सोळा भाज्यांना मागणी

गौराईंच्या पुजनासाठी सोळा प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवितात. या भाज्या बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या असून त्याला प्रचंड मागणी आहे. तीन दिवसांच्या गौरांईंच्या आगमनाने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण होत असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com