जळगाव - Jalgaon

मुंबई-आग्रा महामार्ग क्र. ६ वरील दूरदर्शन टॉवरजवळ आज सकाळी ६.४५ वाजेच्या दरम्यान भरलेला गॅस टँकर व ट्रकचा मोठा अपघात झाला.

जळगाव-भुसावळ दरम्यान दूरदर्शन टॉवरजवळ हा अपघात घडला. नागपूरहून जळगाव कडे येणाऱ्या ट्रक (आयशर) क्र. एम.एच.१८-बी.एच.५३५५ ला इंण्डेन गॅसने भरलेल्या ट्रँकर क्र. एम.एच.१८ बी.जी.१५२५ ने जोरधार डडक दिल्याने हा अपघात घडला.

अपघात येवढा भयानक होता की, भरलेला गॅस टँकरचे सर्व चाके निखळून महामार्गावर इतरत्र पसरली.

एवढेच नव्हे तर त्या टँकरची डिझेल टाकी फुटून त्यातील संर्व डिझेल महामार्गावर लांब पर्यंत पसरले.

गॅस टँकरने पलट्या घेऊन महामार्गाच्या कडेला फेकले गेले.

सुदैवाने यावेळी रस्त्याच्या बाजूने कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला.

अन्यथा याखाली कोणतेही वाहन दाबले गेले असते. महामार्गावर लांब पर्यंत पसरलेले डिझेल व भरलेला गॅस टँकर असल्याने अपघातात आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकचा चालक बचावला असला तरी त्याच्या दोघं पायांना मोठी दुखापत झाल्याचे दिसून आले.

गॅस टँकर चालक अपघात घडताच तेथून फरार झाला. यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॉफीक जाम झाली होती. यानंतर दोन्ही अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला.