गारबर्डी धरण,रावेर
गारबर्डी धरण,रावेर
जळगाव

गारबर्डी धरण ओव्हरफ्लो

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

रावेर - Raver - प्रतिनिधी :

सातपुडा पर्वतरांगेतील सुकी नदीवरील गारबर्डी धरण 100 टक्के पूर्णपणे भरले असल्याने सांडव्यावरून 2 ते 3 सेंटीमीटर प्रवाह सुरू झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले गारबर्डी धरण आज पूर्णपणे भरले गेले असून,यामुळे चिनावल, सावखेडा, उटखेडा,कुंभारखेडा,खिरोदा, रोझोदा, विवरा,निंभोरा, वाघोदा,बलवाडी,तांदलवादी,दसनूर,वडगांव,या गावांना सर्वाधिक फायदा होतो.

बहूतांशी केळी चे क्षेत्र सुकी नदीच्या पर्क्युलेशनवर अवलंबून असल्याने,केळी पट्ट्यात सुकी नदी भरण्यासाठी शेतकरी वाट पाहतात, यंदा देखील लवकर धरण भरले गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com