जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

ग.स. सोसायटीच्या सत्ताधारी व विरोधीगटांच्या 14 संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर संचालक मंडळ अल्पमतात आले होते.

मंगळवारी संचालक मंडळ बरखात करण्यात येऊन प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. बुधवारी सकाळी 11 वाजता प्रशासक व्ही.एम.गवळी, प्रशांत विरकर, भाऊसाहेब महाले यांनी पदभार स्वीकारला आहे.

जळगाव जिल्हा नोकरांची सहकारी संस्था अर्थात ग.स. सोसायटीच्या सत्ताधारी पाच आणि सहकार गटातील नऊ अशा 14 संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर संचालक मंडळ अल्पमतात आले होते.

2 फेबु्रवारी रोजी संचालक मंडळ बरखात करण्यात आल्यानंतर 3 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रशासक व्ही.एम.गवळी, प्रशांत विरकर, भाऊसाहेब महाले यांनी ग.स. सोसायटीचा पदभार स्वीकारला आहे.

प्रशासक नियुक्तीनंतर दैनंदिन कामकाजात कोणताही बदल होणार नाही. सभासदांच्या आलेल्या अर्ज तक्रारींवर चर्चाअंती निर्णय घेण्यात येईल. जोपर्यंत ग.स.सोसायटीची निवडणूक होऊन विद्यमान संचालक मंडळ नियुक्त होत नाही तोपर्यंत प्रशासकच कामकाज पाहणार आहे, असे प्रशासक व्ही.एम.गवळी यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

ग.स.संस्थेच्या जिल्ह्यात 55 शाखा असून बळीरामपेठमधील मुख्य शाखेत तिन्ही प्रशासकांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. संस्थेचे 38 हजार सभासद असून 240 कोटीच्या डिपॉझिट आहेत. तर 892 कोटींचे सभासद कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. कोरोना काळात ठप्प असलेल्या कर्ज वसुली वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

दुसर्यांदा प्रशासक नियुक्त

ग.स.सोसायटीची सन 1909 मध्ये स्थापना झाली असून संस्थेला 111 वर्ष पूर्ण झालेले आहे. आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या ग.स. सोसायटीवर सन 1996-97 मध्ये पहिल्यांदा प्रशासक नियुक्ती करण्यात आली होती. आता 3 फेब्रुवारी 2021 रोजी दुसर्यांदा प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत.