माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्यावर कारवाईचे शिक्षण विभागाचे आदेश

ग.स.नोकरभरती अपहार प्रकरण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

ग.स. सोसायटीच्या नोकरभरतीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

संशयित माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्याबाबत योग्य ती चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने भडगाव गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.

भडगाव तालुक्यतील मळगाव प्राथमिक जि.प.शाळेतील शिक्षक विलास यादवराव नेरकर हे अध्यक्ष असताना व तत्कालीन व्यवस्थापक आरोपी संजय दत्तायत्र ठाकरे यांनी आपसात संगनमत करुन ग.स.सोसायटीचे लिपीक विजय प्रकाशराव पाटील यांचे नियमित वेतनश्रेणीचा आदेशावर संशयित आरोपी विलास नेरकर हे अध्यक्ष नसताना सुद्धा सही करुन स्वत:च्या फायद्यासाठी बनावट आदेश करुन त्याचा वापर करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात 8 फेब्रवारी 2021 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी विलास नेरकर फरार आहे, असे पत्र शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. धनंजय येरुळे यांनी जि.प.मुख्य कार्यकारी जळगाव यांना 24 मार्च रोजी दिले आहे.

या पत्राच्या आधारावर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे यांनी भडगावचे गटविकास अधिकार्‍यांना 28 एप्रिल रोजी पत्र देवून विलास नेरकर हे आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असून या कारवाईचे अधिकार गटस्तरावर असल्याने नेरकर यांच्यावर आपल्या स्तराहून योग्य ती चौकशी व कारवाई करुन कारवाईचा अहवाल तात्काळ शिक्षण विभागाला सादर करावा. असे म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com