ग्रा.पं.निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना दिला निधी

ग्रा.पं.निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना दिला निधी

२५१५ अंतर्गत अनेक गावांत होणार लोकहिताची विकासकामे

अमळनेर - प्रतिनिधी Amalner

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी मिळवा या आमदार अनिल पाटलांच्या खुल्या ऑफरला अनेक गावांनी प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध केली असताना आमदारांनी देखील अल्पावधीतच यातील असंख्य गावांना विकास कामांसाठी निधीची तरतूद करून आपली शब्दपूर्ती केली आहे.

लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत सदर गावांना लोकहिताची विकासकामे मंजूर झाली आहेत.ज्यां गावांनी लागलीच कामांची मागणी करून प्रस्ताव सादर केला त्या गावांना कामे मंजूर झाली असून उर्वरित गावांना देखील मागणीनुसार लवकरच कामे मंजूर होतील अशी माहिती आमदारांनी दिली.

दरम्यान गावागावातील एकोपा टिकून राहावा,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीमुळे संक्रमण वाढू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी यासाठी मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध पार पाडतील त्या ग्रामपंचायतींना २५ लाख रुपयांचा निधी गावाच्या विकासासाठी तात्काळ उपलब्ध करुन गावाच्या विकासासाठी चालना देण्याचा निर्णय ग्रामपंचायत निवडणूकच्या वेळी आमदारांनी जाहीर केला होता.

ग्रामपंचायत निवडणुका टाळाव्यात,सर्व सदस्य बिनविरोध निवडले जावेत यासाठी आमदारांनी हे आवाहन करत सर्व गावांना विकास कामांची एक खुली ऑफरच दिली होती,त्यानुसार खालील प्रमाणे गावांना कामनिहाय निधी उपलब्ध झाला आहे.

या गावांना मिळाला निधी

एकतास संरक्षण भिंत-१५लाख रुपये, एकरुखी पाईप मोरी बांधकाम -२५ लाख, कुर्हे बु सब स्टेशन ते स्मशान भूमी पर्यंत काँक्रिटीकरण रस्ता- १५ लाख ,महाळपुर स्मशानभूमी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण १५ लाख, भोलाने स्मशानभूमी पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण - १५ लाख, येथे रस्ता कॉंक्रिटीकरण लाख, जळोद सभामंडप बांधकाम- १५ लाख, दापोरी गावदरवाजा- ७ लाख, दापोरी शुद्ब पाणी प्लांट- ५ लाख, दापोरी चौक सुशोभीकरण ३ लाख, दळवेल रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, टाकरखेडा रस्ता काँक्रीटीकरण- १५ लाख, पिंपळे बु सभामंडप बांधकाम- १५लाख, वसंतनगर तांडा रस्ता काँक्रीटीकरण -१० लाख, वसंतनगर तांडा स्मशानभूमी सांत्वन शेड- ५ लाख, फाफोरे येथे पेव्हरब्लॉक चौक सुशोभीकरण १५ लाख, इंधवे पेव्हरब्लॉक व चौक सुशोभीकरण -२० लाख, जीराळी संरक्षण भिंत- १० लाख, देवळी शुद्ब पाणी प्लांट- ७लाख, देवळी स्मशानभूमी व सांत्वन शेड बांधकाम- ८ लाख, कलाली विठ्ठल मंदिर बांधकाम- १५ लाख आदी कामे मंजूर झाली असून लवकरच ही कामे सुरू होणार आहेत.

अल्पावधीतच आमदारांनी शब्दाची पूर्ती केल्याने संबधित गावांचे सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com