वर्षभरापासून फरार दुचाकी चोरट्याला अटक

दुचाकी हस्तगत ; जिल्हापेठ पोलिसांची कामगिरी
वर्षभरापासून फरार दुचाकी चोरट्याला अटक

जळगाव - jalgaon

शहरातील चित्रा चौक परिसरातील विजेंद्र हॉस्पिटलसमोरुन दुचाकी लांबविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तब्बल वर्षभरापासून फरार असलेल्या संशयिताना बुधवारी जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. जीवन गोकूळ शिंदे वय २८ रा. कठोरा ता. जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील आसोदा येथील हरिष गिरधन भोळे यांची १७ जुलै २०२० रोजी जळगाव शहरातील विजेंद्र हॉस्पिटल समोरुन एम.एच. १९ २१०९ या क्रमांकाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीस गेली होती. याप्रकरणी भोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हयात संशयित निष्पन्न करुन त्याबाबत गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे, पोलीस नाईक सचिन देशमुख यांच्या पथकाने संशयित जीवन शिंदे यास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. संशयिताकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com