डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आरटीपीसीआर चाचणी निःशुल्क

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आरटीपीसीआर चाचणी निःशुल्क

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय तसेच रूग्णालय हे वैद्यकिय यंत्रणा,सुविधांसह पॅरामेडिकल कर्मचारी यंत्रणा असल्याने अत्यावश्यक सेवेंतर्गत डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सेवा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून अधिग्रहित करण्यात आले आहे.

कोरोना प्रादूर्भाव प्रतिबंधक उपायायोजनांतर्गत आपत्कालीन व्यवस्था म्हणून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यास निर्देशित करण्यात आले आहे.

त्यानुसार अत्यावश्यक सेवेंतर्गत अधिग्रहित करण्यात आलेल्या रूग्णालयामार्फत आरटीपीसीआर तपासणीसाठी कोणत्याही रूग्णांकडून शुल्क आकारणी करू नये असे जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात निर्देशीत केले आहे.

जिल्हयात शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, तसेच शासकिय वैद्यकिय तपासणी प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी करण्यात येते. तसेच वाढता संसर्ग काळात स्वॅब तपासणीसाठी अन्य जिल्हयात मान्यताप्राप्त लॅबमधे पाठविण्यात येतात.

जिल्हयात सद्यस्थितीत कोविड -19 विषाणू संसर्ग प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता या सुविधांवर अतिरिक्त ताण येवू नये, यासाठी स्वॅब तपासणी अहवाल वेळेवर मिळावेत व कान्टॅक्ट ट्रेसिंग करणे सुलभ व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर अतिरिक्त आरटीपीसीआर तपासणी लॅब सेवा अधिग्रहित करण्यात आली असून लॅब कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक त्या परवानगी संबधीत रूग्णालयाने घ्यावी.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयात आरटीपीसीआर चाचणीसाठी कोणत्याही रूग्णांकडून शुल्क आकारणी करू नये.

दैनंदिन चाचण्यांचा अहवाल जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे पाठविणे आवश्यक आहे. व तशी नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर करण्याची जबाबदारी संबधीत रूग्णालयाची असल्याचे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com