चाळीसगाव : 108 ग्रामपंचायतींना मोफत इंटरनेट सेवा
जळगाव

चाळीसगाव : 108 ग्रामपंचायतींना मोफत इंटरनेट सेवा

पंचायत समिती कार्यालयात वायफाय सेवेचा शुभारंभ

Rajendra Patil

चाळीसगाव । प्रतिनिधी Chalisgaon

तालुक्यातील 108 ग्रामपंचायत सह पोस्ट ऑफिस, रेशन दुकान, जिल्हा परिषद शाळा, बँक, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, तलाठी कार्यालय व सी.एस.सी.केंद्रांना मोफत इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब केदार यांच्या हस्ते शुभारंभ करून प्रथम पंचायत समिती चाळीसगाव येथे वायफाय इंटरनेट सेवेचा नुकताचा शुभारभ करण्यात आला.

ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय, सेतू सुविधा, शेती माल खरेदी विक्री, बँक सेवा, टेली मेडिसिन, ई कोर्ट, मोबाईल बँकिंग, नोकरीं मार्गदर्शन केंद्र, महिला बचत गट केंद्र, गॅस बुकिंग केंद्र, ऑनलाईन शिक्षण, डीजीटल व्यवहार, ऑनलाईन सेवा केंद्र यांना देवाण-घेवाण सेवा प्रधान करण्यासाठी इंटरनेटचा सर्वाना फायदा होणार आहे. या योजनेला डिजिटल व्हिलेज असे सुद्धा म्हणतात.

या योजने अंतर्गत फक्त गावोगावात ऑप्टीक फायबर द्वारे इंटरनेट पोहचवणे नसून गावातील नागरिंकाना डिजिटली साक्षरता व शिक्षित करून गावाचा विकास अधिक ग्लोबल होण्यासाठी तसेच डिजीटल इंडिया संकल्पना ग्रामीण भागात पोचून ग्रामीण संकल्पना व ऊर्जा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, त्याने गावातील युवकांना रोजगार, शिक्षण, नोकरी, उद्योग व्यवसायसाठी फायदा होणार आहे.

प्रथम चरणात ग्राम पंचायत व सी.एस.सी. केंद्र यांना मोफत इंटरनेट सेवा प्रधान कण्यात येणार आहे.सी.एस.सी. भारत नेट सेवा प्रधान करण्यासाठी अनिल शेंडे, वाल्मीक महाले, राहुल देवरे, अभिनंदन पाटील, गजानन पाटील, उत्कर्ष वाणी व ओएफसी तुफान टीम चाळीसगाव आदी मेहनत घेत आहेत.

याप्रसंगी गटविकास अधिकारी अतुल पाटील, सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील, सदस्य संजय पाटील, स्मितल बोरसे, जिभाऊ पाटील, दिनेश बोरसे, भोरस सरपंच गोपाल पाटील, गोलू पाटील, विष्णु चकोर, संदीप रणदिवे, राहुल पाटील, राहुल अहिरे, चेतन महाजन आदि उपस्थित होते.

सी.एस.सी. वायफाय समन्वयक वाल्मीक महाले यांनी सांगितले की, जळगाव जिल्यात एकूण 651 ग्रामपंचायत गावांना इंटरनेट सेवा सुरु करण्याचे काम चालू आहे. चाळीसगाव तालुक्यात पंचायत समिती येथून शुभारंभ करून 108 ग्रामपंचायत गावांना आजपासून इंटरनेट सेवा सुरु करण्याचे काम करीत आहोत. त्याच बरोबर ग्रामीण भागातील शासकीय कार्यालय, वैयक्तीक घरी आणि दुकानदार व्यापारी वर्ग यांना सुद्धा वायफाय ब्रॉड बॅन्ड कनेक्टीविटीचा वापर करण्यात येईल.

Deshdoot
www.deshdoot.com