प्रशिक्षण केंद्राच्या नावाने 180 केंद्र चालकांची फसवणूक

दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रशिक्षण केंद्राच्या नावाने 180 केंद्र चालकांची फसवणूक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

निती आयोगाचे Policy Commission बनावट कागदपत्रे Fake documents दाखवून पिंप्राळा येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतंर्गतMaharashtra State Skill Development Society पिंप्राळ्यासह इतर ठिकाणच्या अशा एकूण 180 केंद्र चालकांची तब्बल 94 लाख 14 हजार 853 रूपयांची फसवणूक Cheating झाल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली आहे.

याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला असून यात फसवणुकी करणार्‍या टोळीचा सूत्रधार अविनाश उर्फ अर्जुन कळमकर (रा.दैठणे गुंजाळ, ता.पारनेर, जि.अहमदनगर) या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

योगीता उमेश मालवी (वय-38) रा. दांडेकर नगर पिंप्राळा हे खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. व्यवसाय करत असल्याने त्यांची अविनाश अर्जून कळमकर रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी डिसेंबर 2018 मध्ये ओळख झाली.

डिसेंबर 2018 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत कळमकर याने योगिता मालवी यांच्याशी वेळोवेळी संपर्क करुन माझ्या मायभूमी ग्रामविकास संस्थेला आयकर विभागाची मान्यता असून 12 (एए) व 80 जी प्रमाणपत्र प्राप्त असल्याने त्या आधारावर वेगवेगळ्या कंपन्याचा सीएसआर फंड मिळतो व त्यानू आम्ही वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करीत असल्याचे कळविले.

कौशल्य विकास सोसायटीच्या योजना राबविण्यासाठी निती आयोगाची मान्यता आहे असे सांगून त्याचे कागदपत्रे सादर केली होती. चालू वर्षासाठी 5 कोटी व पुढील वर्षासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याचे कळमकर याने सांगितले. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे विश्वास संपादन केला व वेळोवेळी पैशांची मागणी केली.

बचत गटाची योजना सांगूनही फसविले

कळमकर याने सांगितल्यानुसार मालवी यांनी त्याच्या संस्थेशी आठ कोर्स चालविण्याबाबत करार केला. या कराराप्रमाणे 177 संस्थाचालकांनी रोखीने तसेच बँक खात्यात 33 लाख रुपये देऊन संस्थेची नोंदणी करुन घेतली. त्यात पहिल्या 48 केंद्र 15 हजार प्रमाणे तर 129 केंद्रांकडून 20 हजार या प्रमाणे शुल्क आकारण्यात आले. तीन महिन्याचा कोर्स पुर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम मिळणार असल्याचे कळमकर याने सांगितले होते. 177 केंद्रांनी 19 हजार 861 विद्यार्थ्यांची नोंदणी करुन प्रशिक्षण घेतले.

त्याच्या परीक्षाही घेण्यात आल्या. याचदरम्यान संबंधित प्रशिक्षक संस्थांना बँकेत सेव्हींग व करंट अशी दोन वेगवेगळे खाते उघडण्याचे कारण देत कळककर याने अर्ज भरुन घेत एकूण 48 लाख 53 रुपये घेतले. मात्र बॅक खाते सुरुच झाले नाही. तर दुसरीकडे या बॅचेस सुरु असतानाच कळमकर याने महीला बचत गटाची योजना सांगून गृहउद्योगाच्या नावाखाली 674 बचत गट तयार करुन प्रत्येकी एक हजार या प्रमाणे 6 लाख 74 हजार रुपये त्यांच्याकडून जमा केले. त्यानंतर बचत गटांनी तयार केलेले साहित्याच्या नावाने प्रति बचत गट 8 हजार याप्रमाणे 53 लाख 92 हजार रुपये पुन्हा जमा केले.

कोट्यवधीचे चेक दिले, मात्र वटलेच नाही

अशापध्दतीने वेळोवेळी वेगवेगळ्या कारणाने योगीता मालवी यांच्यासह 180 केंद्र चालकांकडून 94 लाख 14 हजार 853 रुपये घेऊन कळमकर याने फसवणूक केली. मालवी यांच्यासह त्यांच्या संस्थेअंतर्गत 180 प्रशिक्षण केंद्र चालकांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यावर संबंधित सर्वांनी कळमकर याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला.

त्यानंतर कळमकर याने 2019 मध्ये 11 कोटी, 20 कोटी, 11 कोटी तसेच 7 कोटी रुपयाचे वेगवेगळया तारखांचे धनादेश दिले. एकही चेक वटला नाही. अखेर योगिता उमेश मालवी (वय 38) यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मायभुमी ग्रामविकास संस्थेचा सचिव अविनाश उर्फ अर्जुन कळमकर, अध्यक्षा प्रीती विनायक खवले, उपाध्यक्षा प्रमिला अर्जुन कळमकर, खजिनदार कांचन दादाभाऊ ढगे, सदस्य शिवराम आप्पाजी जासूद, संगीता शिवराम जासूद व अर्जुन माधव कळमकर यांच्यासह इतर अशा दहा जणांविरुध्द रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

पारनेर येथील मूख्य सूत्रधाराला अटक

रात्री पावणे बारा वाजता रामांनद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी लगेच आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक भास्कर डेरे यांना पथक रवाना करण्याचे आदेश दिले.

सूत्रधार अविनाश कळमकर याच्या ठावठिकाण्याबाबत पोलिसांनी माहिती घेतली होती. तो पारनेर येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप पाटील, वसीम शेख व नितीन सपकाळे या तिघांचे पथक पारनेरला निघाले. पहाटे अडीच वाजता घरात झोपलेला असतानाच कळमकर याला अटक करण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विजय पाटील व संदीप साळवे यांची मदत घेण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com