१८ शेतकर्‍यांची ३५ लाखांत फसवणूक
जळगाव

१८ शेतकर्‍यांची ३५ लाखांत फसवणूक

तिघं कापूस व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

पंधरा दिवसांत पैसे देण्याच्या बोलीवर कापूस खरेदी करणार्‍या जळगावातील तीन व्यापार्‍यांनी तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकर्‍यांची ३५ लाख ११ हजार २८९ रुपयांची फसवणूक केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघं व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात वाल्मीक एकनाथ पाटील (वय ४०, रा.शिवाजी चौक, धानवड) या शेतकर्‍याने फिर्याद दिली. धानवड येथे अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (पूर्ण नाव माहिती नाही, तिघं रा.अयोध्यानगर, जळगाव) हे तिघं कापूस खरेदी करणारे व्यापारी धानवडमध्ये शेतकर्‍यांकडून कापूस खरेदीचा व्यवसाय करतात. ते २० मे ते ९ जून दरम्यान वाल्मीक एकनाथ पाटील यांच्यासह इतर शेतकर्‍यांना भेटले. १५ दिवसांमध्ये पेमेंट करण्याचे आश्‍वासन देवून त्यांनी काही जणांना ॲडव्हान्स देत १८ शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी केला. त्यानंतर ट्रक (क्र.एमएच १९ सीवाय ०७१७) ने कापसाची वाहतूक केली. परंतु, त्या व्यापार्‍यांनी अद्यापही शेतकर्‍यांना कापसाचे पैसे दिले नाही. पैसे मागितले असता, व्यापारी टाळाटाळ करीत आहेत.

यांची झाली फसवणूक

वाल्मिक एकनाथ पाटील (५० क्विंटल १३ किलो- २ लाख ३५ हजार ६०० रुपये), पंढरीनाथ बाबुराव पाटील (८४ क्विंटल क्विंटल ४० किलो- ३ लाख ९६ हजार ६८० रुपये), कैलास आत्माराम पाटील (११० क्विंटल- ५ लाख १७ हजार), बाबुराव तुळशिराम पाटील (६१ क्विंटल- २ लाख ८६ हजार ७०० रुपये), पंडित मधुकर पाटील (९७ क्विंटल ८५ किलो- २ लाख ५० हजार), रंगनाथ यशवंत पाटील (२१ क्विंटल- ९८ लाख ७००), समाधान भाऊराव पाटील (५२ क्विंटल ८० किलो- २ लाख ४८ हजार १६० रुपये), शांताराम एकनाथ पाटील (३७ क्विंटल ५० किलो - १ लाख ४५ हजार), राजेंद्र शिवराम पाटील (५३ क्विंटल ४५ किलो- २ लाख ५१ हजार २१५ रुपये), बापू सदाशिव भावसार (१२ क्विंटल ७७ किलो- ६० हजार ११९ रुपये), प्रभुदास बाबुराव पाटील (८६ क्विंटल ६० किलो- २ लाख), नामदेव गोविंदा पाटील (३९ क्विंटल ५७ किलो- १ लाख ), अशोक शेनफडू पाटील (१०० क्विंटल ८० किलो- एक लाख २३ हजार), राजाराम लक्ष्मण आवारे (२० क्विंटल ४५ किलो- ९६ हजार ११५ रुपये), अर्जुन लक्ष्मण आवारे (६४ क्विंटल ८० किलो- २ लाख ५४ हजार), सखाराम लक्ष्मण आवारे (९ क्विंटल- ३९ हजार ३०० रुपये), बंडू गोबा पाटील (२१ क्विंटल- १ लाख १ हजार ९९० रुपये), नाना माधव पाटील (६ क्विंटल- २८ हजार २०० रुपये), चंद्रकांत नामदेव आवारे (२७ क्विंटल २८ किलो- १ लाख) अशा १८ शेतकर्‍यांची एकूण ३५ लाख ११ हजार २८९ रुपयांमध्ये फसवणूक झाली.

Deshdoot
www.deshdoot.com