जळगाव - Jalgaon

शहरात बुट विक्रीचा व्यवसाय करणार्या परप्रांतीय व्यावसायिकाला रिक्षात बसून चौघांनी दमदाटी करुन त्याच्याकडील ४ हजार ५०० रुपये रोख व मोबाईल असा एकूण ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना आज समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबुलाल डिगांबर निंबोरे वय ७१ हे वृध्द बोरी मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. शहरात बुट विक्री व्यवसायानिमित्ताने ते आले आहेत. २० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजकमल चौक येथे रिक्षाची प्रतिक्षा करत होते. रिक्षा आल्यानंतर ते त्यात बसले. रिक्षात चौघे जण बसलेले होते. तयतील एकाने खाली उतरुन निंबोरे यांना इतरांच्या मधोमध बसविले.

राजकमल चौक ते पांडे चौकादरम्यान रिक्षातील चौघांनी निंबोरे यांच्य खिशातील ४ हजार ५०० रुपयांची रोकड व १ हजार १०० रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज बळीजबरीने काढून घेतला व यानंतर निंबोरे यांना बी.जे. मार्केटसमोर झिपरु अण्णा समाधी जवळ रिक्षातून उतरवून दिले आणि चौघे पसार झाले. याप्रकरणी २२ फेबु्रवारी रोजी डिगांबर निंबोरे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन चौघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे हे करीत आहेत.