कंजरवाड्यातील तरुणाकडून चार किलो गांजा जप्त

आर.एल.चौफुलीवर करत होता विक्री ; एमआयडीसी पोलिसांकडून अटक
कंजरवाड्यातील तरुणाकडून चार किलो गांजा जप्त

जळगाव - Jalgaon

शहरातील आर.एल.चौफुली (R.L. Chaufuli) वर गांजा विक्री करणार्‍या बबलू उर्फ टारझन अरूण दहेकर (वय-३२) रा. जाखनीनगर कंजरवाडा या तरूणाला पोलीसांनी अटक केली असून १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा साडेचार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव ते औरंगाबाद रोडवरील आर.एल.चौफुलीवर बेकायदेशीररित्या आर.एल. चौफुलीवर मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास एकजण विक्री करत असल्याची गोपनिय माहिती (MIDC Police Thane) एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार शिकारे यांनी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने कारवाई करत त्याच्याकडे मिळून आलेला १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा ४ किलो ४८५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात केला. याप्रकरणी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com