जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू
जळगाव

जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू

बहुळा नदीत दोघे बुडाले; मेहुणबारे येथे दोघांचा अपघात

Rajendra Patil

पाचोरा/मेहुणबारे, ता.चाळीसगाव । Pachora Chalisgaon

जिल्ह्यात पाचोरा व चाळीसगाव येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. पाचोरा येथील बहुळा नदीतील केटी वेअरमध्ये बुडाल्याने दोघां बालकांना जीव गमवावा लागला. तर मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथे झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार दोघांचा मृत्यू झाला आहे.

जारगाव नुरानीनगर भागातिल जुनेद अनिस बागवान (वय 13), शाहिद अफजल मन्सुरी (वय 14 ) व वाजिद जावेद पटेल (वय 8) ही तिनही मुले दि.11 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बहुळा नदिपात्रात खेळण्यानिमित्ताने नदीत गेले होते. नदिपात्रात खेळत असतांना ते मुख्यधारेत आलेल्यामध्ये वाहु लागले असता यावेळी तेथे जारगाव येथिल पवन नामक युवकाने वाजिद जावेद पटेल या 8 वर्षाच्या मुलाला वाचविले. पण दोघेजण पात्रात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. मुलांना वाचविण्यासाठी पट्टीचे पोहणारेही घटनेच्या ठिकाणी पोहचले. ज्या ठिकाणी ही मुल बुडाली त्याठिकाणी हुसेन मच्छीवाले पट्टीच्या पोहणार्‍या गोताखोराने जुनेद अनिस बागवान या 13 वर्षाच्या बालकास बाहेर काढले. त्याला तत्काळ ग्रामिण रूग्णालयात नेले गेले असता त्यास वैद्यकिय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

तर शहिद अफजल मन्सुरी या मुलाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. चार दिवसांपुर्विच बहुळा नदिवरील खडकदेवळा धरण पुर्ण भरून वाहत असल्याने नदि पात्रालगत राहणार्‍या नागरिकांना सर्तक राहण्याचा शासनाने इशारा दिला होता. मयत जुनेद याचे वडिल हातमजुरी करणारे असुन त्यांना एकुलता एक मुलगा होता. तर शाहिद याचे वडिल चारचाकी गाड्यांना ग्रिस लावण्याचे काम करतात. या घटनेमुळे जारगाव नुरानीनगर भागात शोककळा पसरली असुन शाहिदला शोधण्यासाठी गोताखोर हुसेन मच्छीवाले व अख़्तर शेख, युनुस मैलाना त्यांचे सहकारी युद्धपातळीवर शोध घेत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com