नोकरीच्या आमिषाने चौघांची २९ लाखात फसवणूक

नोकरीच्या आमिषाने चौघांची २९ लाखात फसवणूक

मुक्ताईनगर तालुक्यातील मायलेकासह बहिणीला रामानंदनगर पोलिसांकडून अटक

जळगाव- jalgaon

बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जळगाव शहरातील दोघांसह पुणे, मुंबई व भुसावळ अशा पाच जणांची २९ लाख ८० हजार रुपयांत बनावट नावांच्या आधारे फसवणूक करणार्‍या मुक्ताईनगर तालुक्यातील मायलेकासह बहिणीला रामानंदनगर पोलिसांनी सोमवार, १९ जुलै रोजी अटक केली आहे.

अंकित गोवर्धन भालेराव (वय २८,), त्याची आई रत्नमाला गोवर्धन भालेराव (वय ६२), व बहिण स्वाती गोवर्धन भालेराव (वय ३०) (तिघे रा. रा. बौध्दवाडा मुक्ताईनगर) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. तिघांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित अंकित भालेराव सोमवारी आपली कार चोरल्याचा बनाव करुन रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आला, तक्रार दिली अन् पोलिसांच्या चौकशीत स्वतः तसेच आई, बहिणीसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला असल्याची माहिती मिळाली आहे.

नोकरीचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी अमोलने राणे याच्याशी १२ जुलै रोजी संपर्क केला असता तुमचे काम झाले आहे, तुम्ही १६ जुलै रोजी नाशिकला या आपण ये्थून १७ रोजी नोकरीच्या प्रोसेसकामी जळगावाला जावू असे सांगून अमोल यांना नाशिकला बोलावले. तेथून राणे याच्या कारने (क्र.एम.एच.१५ जी.एक्स ६५९९) पहाटे पाच वाजता जळगावसाठी निघाले. सकाळी साडे नऊ वाजता एका हॉटेलजवळ आले. तेथे मी तुझ्या कामाची प्रोसेस करण्यासाठी जातो तू इथेच थांब व माझी कार तुझ्याजवळच राहू दे असे सांगून राणे हा तेथून निघाला. थोड्याच वेळात अमोल यांना रामानंद नगर पोलीस ठाण्यातून फोन आला, तुम्ही कार चोरली आहे का? तुमच्याविरुध्द तक्रार आली असून तक्रारदार पोलीस ठाण्यात आहे, असे सांगितल्याने अमोल यांनी पोलीस ठाणे गाठले असता तेथे राणे व एक मुलगी आधीच आलेली होती. पोलिसांना खरा प्रकार सांगितले असता त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात राणेचे खरे नाव अंकित गोवर्धन भालेराव व जी मुलगी होती तिचे नाव स्वाती गोवर्धन भालेराव असे होते. दोघं भाऊ बहिण असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान तिघांनी अमोल चौधरीसह हेमंत सुभाष भंगाळे (वय ३३,रा.नेहरु नगर) या तरुणाला ४ लाख, पूर्वा ललित पोतदार (वय ३२, रा.पुणे) यांना ७ लाख ३० हजार, देवेंद्र सुरेश भारंबे (वय ३६, रा.भुसावळ) यांना २ लाख ४० हजार तर बांधकाम व्यावसायिक नितीन प्रभाकर सपके (वय ४५, रा.आनंद नगर, जळगाव) यांना १२ लाख ६० हजार रुपयात याप्रमाणे पाच जणांची एकूण २९ लाख ८० रुपयांत फसवणूक केली आहे. दिवसभराच्या चौकशीअंती सोमवार १९ जुलै रोजी अमोल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com