हरदा नकली नोट कनेक्शन प्रकरणी चार जणांना अटक

रावेर पोलिसांची कामगीरी, सात हजाराच्या नकली नोटा हस्तगत
हरदा नकली नोट कनेक्शन प्रकरणी चार जणांना अटक

रावेर|प्रतिनिधी Raver

हरदा (म.प्र. Harda MP) येथील नकली नोटांचे कनेक्शन रावेरात असल्याने,रावेर पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत शहरातील आणखी ४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन ७ हजाराच्या नकली नोटा हस्तगत केल्या आहे.

शनिवारी हरदा पोलीस रावेरात धडकले होते, हरदा येथे नकली नोटांचे कनेक्शन रावेरात असल्याचे उघड झाल्याने, शेख शकिर शेख हाफिज या आरोपीला पकडून, सोबत घेऊन गेले होते,याघटनेच्या अनुषंगाने रावेर पोलिसांनी सखोल चौकशीअंती आणखी ४ जणांची झाडाझडती घेतली असता,त्यांच्याकडून १०० व २०० च्या ७ हजार रुपये किंमतीच्या नकली नोटा हस्तगत केल्या आहे.

सोमवारी पहाटे दोन वाजता पोलिसांनी धडक कारवाई करून असलम उर्फ राजू सुपडू तडवी वय-३० रा.पाच बीबी टेकडी रावेर,सोनू मदन हरदे वय-३० रा.अफ्फुगगल्ली रावेर,रवींद्र राजाराम प्रजापती वय-३१ रा.कुंभारवाडा रावेर, शेख साकीर शेख साबीर वय-२६ रा.खाटीकवाडा, रावेर या चार जणांना अटक करून त्यांच्याकडील ७ हजाराच्या नकली नोटा हस्तगत केल्या आहे. यातील पाचवा आरोपी शकिर शेख हाफिज हा आरोपी हरदा पोलिसांच्या कस्टडीत आहे.रावेर पोलिसांत याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com