जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरात सर्वत्र अमृत योजनेचे तसेच भुयारी गटारीचे काम सुरु आहे. या रस्ते नादुरूस्त होवून चिखलाने माखले आहेत.

शनिवारी दिवसभरात बेंडाळे महाविद्यालसमोर चिखल व नादुरूस्त रस्त्यावर चार अपघात झाले. एखाद्या सिनेमाप्रमाणे याठिकाणी दुचाकी घसरत असल्याचे चित्र असून वाहनचालकांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागत आहे.

बेेंडाळे महाविद्यालयासमोर शनिवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने वेळेच्या काही अंतराने चार दुचाकी घसरल्या. या घटनेती काहींना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. याठिकाणी चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी अपघातानंतर दुचाकी बाजूला करुन जखमी दुचाकीस्वारांना रुग्णालयात हलविले.

नागरिकांच्या जीवावर उठलेले रस्ते कधी दुरूस्त होणार, की एखाद्याचा जीव गेल्यावरच या रस्त्याच्या दुरूस्तीला महापालिकेला मुहूर्त गवसणार असाही संतप्त सवाल वाहनधाकांमधून उपस्थित होत आहे.