स्मिता वाघ
स्मिता वाघ
जळगाव

माजी आमदार स्मिता वाघ यांना करोनाचा संसर्ग

संपर्कातील कार्यकर्त्यांनी तपासणी करण्याचे केले आवाहन

Rajendra Patil

अमळनेर | प्रतिनिधी | Amalner

येथील माजी आ.शिरिष चौधरी यांचे नंतर तालूक्यातील दूसरे माजी आमदार भाजपाच्या विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिताताई वाघ यांनाही करोनाचा संसर्ग झाला असून त्यांना जळगाव येथील गोल्ड सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी जागरूकता म्हणून स्वताची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ही माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

यापूर्वी भाजपाचे माजी खा.कै.हरिभाऊ जावळे करोना पॉझिटिव्ह आल्याने श्रीमती वाघ यांचीही टेस्ट करण्यात आली होती, त्यावेळी त्यांचा अहवाल निगेटीव आला होता. अमळनेर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना पुरेशा सुविधा मिळणे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी माजी आमदार स्मिताताई वाघ सातत्याने काम करीत आहेत. त्यामुळे हे काम करीत असतानाच गेल्या आठवड्यात त्या कोणत्यातरी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासुन त्रास जाणवत होता. त्यामुळे मंगळवारी त्यांचे जळगाव येथे स्वँब घेण्यात आले. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जळगाव येथील गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माजी आ.शिरिष चौधरी यांनी सुरत येथे उपचार घेतले ते सध्य नंदूरबार येथील निवासस्थानी होम कॉरंटाईन आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com