रोझलॅन्ड स्कूलला आंबेडकर जयंतीचा विसर

रिपाइंच्या आंदोलनानंतर दुसर्‍या दिवशी प्रतिमा पूजन
 रोझलॅन्ड स्कूलला आंबेडकर जयंतीचा विसर

जळगाव- Jalgaon

शहरातील गणेश कॉलनी येथील रोझलॅन्ड इंग्लिश मिडीयम स्कूलला काल बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीला विसर पडला. शाळेत जयंती साजरी करण्यात आली नाही. जयंती साजरी न करणार्‍या या शाळेच्या संस्थाध्यक्षांसह मुख्याध्यापकांचा निषेध व्यक्त करुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने आज गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शाळेत ठिय्या आंदोलन केले. तसेच शाळेची मान्यता रद्द करुन मुख्याध्यापकांवर कारवाई करावी अशी मागणी केली.

शहरातील गणेश कॉलनी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या बाजूला रोझलॅन्ड इंग्लिश मीडीयम स्कूल आहे. या स्कूलमध्ये काल बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली नसल्याची माहिती आज गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांना मिळाली. अडकमोल यांनी कार्यकर्ते प्रताप बनसोड, किरण अडकमोल, रोहित गायकवाड व स्वप्निल पाटील या कार्यकर्त्यांसह शाळा गाठली. याठिकाणी मुख्याध्यापिका मीना पाटील यांना जयंती का साजरी केली नाही, याबाबत जाब विचारला. यावेळी शाळेत इतरही शिक्षक उपस्थित होते.

शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी

रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नांवर रोझलॅण्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका मीना पाटील यांची चांगलीच भंबेरी उडाली. आजारी असल्यामुळे जयंती साजरी केली नाही, उद्या करणार होते, तसेच शाळेच्या प्रमुखांनी कोरोनामुळे जयंती साजरी न करण्याचे सांगितल्याचे असल्याचेही उत्तर दिले. यावर अडकमोल यांनी मुख्याध्यापिका पाटील यांना खडेबोल सुनावत जयंती साजरी न केल्यामुळे निषेध व्यक्त केला. त्यानंतर काल जयंती न साजरी केल्यामुळे आज बाबासाहेब आंबेकडकर यांच्याी प्रतिमेचे पूजन करुन त्यास माल्यार्पण करण्यात आले. जयंती साजरी न करणार्‍या शाळेची शासनान मान्यता रद्द करावी, शाळेतील सर्व संचालक मंडळ तसेच संबंधित मुख्याध्यापिका मीना पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे. तसेच कार्यवाही न झाल्यास रिपाइंच्या वतीने शाळेसमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अनिल अडकमोल यांनी निवेदनाव्दारे दिली आहे. याबाबत निवेदन त्यांनी शिक्षणमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.

कोट

रोझलॅन्ड स्कूलमधील प्रकाराबाबत माहिती मिळाली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. त्यांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com