भारत बंदसाठी आंदोलकांकडून दुकाने बंदसाठी जबरदस्ती

सर्वपक्षीय भारत बंदचा उडाला फज्जा
भारत बंदसाठी आंदोलकांकडून दुकाने बंदसाठी जबरदस्ती

जळगाव : Jalgaon

शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात तसेच (Central government) केंद्र शासनाकडून केल्या जाणार्‍या खासगीकरणाविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे सोमवारी संपुर्ण भारत बंदची हाक देण्यात आली होती. मात्र आंदोलक व्यापारी संकुलात जावून जबरदस्तीने दुकाने बंद करीत होते. दरम्यान, आंदोलकांची पाठ फिरताच व्यापार्‍यांनी पुन्हा दुकाने उघडण्यात आल्याने भारत बंदचा फज्जा उडाला.

शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात तसेच केंद्र शासनाकडून केल्या जाणार्‍या खासगीकरणाविरोधात जिल्हा कॉंग्रेस कमिटी, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे व्यापार्‍यांनी आपली दुकाने खुली करीत व्यापाराला सुरुवात केली होती. मात्र थोड्यावेळातच आंदोलक मोदी हटाओ देश बचाओ अशा घोषणा देत रस्त्यावर उतरले. त्यानंतर आंदोलकांनी शहरातील फुले मार्केट, गोलाणी मार्केट या व्यापारी संकुलांमध्ये जावून व्यापार्‍यांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद न केल्याने काही आंदोलकांनी व्यापार्‍यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी आंदोलक व व्यापार्‍यांची समजूत काढल्यानंतर व्यापार्‍यांनी काही काळ आपली दुकाने बंद केली.

आंदोलक माघारी होताच दुकाने पुन्हा सुरु

आंदोलक बाजारपेठेसह व्यापारी संकुलात जावून व्यापार्‍यांना आपली दुकाने बंद करायला लावित आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत होते. यावेळी व्यापार्‍यांनी काही काळ दुकाने बंद केली ल्याने शहरातील सर्वच बाजारपेठा सकाळी बंद झाल्या. मात्र आंदोलक माघारी होताच काही वेळातच बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्याने बंदचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.

माजी मंत्र्यांसह पदाधिकार्‍यांकडून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

माजी खा. डॉ.उल्हास पाटील, आ. शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा मंगला पाटील, युवती अध्यक्षा कल्पीता पाटील, राष्ट्रवादीचे वाल्मिक पाटील, विनोद देशमुख, शहराध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादीचे विलास पाटील, जिल्हा सरचिटणीस डी. जी. पाटील, अशोक लाडवंजारी यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत शहरातील बाजारपेठा बंद करीत व्यापार्‍यांना आंदेालनात सहभागी हेाण्याची आवाहन करीत होते.

Related Stories

No stories found.