जळगाव : जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी करोनाचे ‘द्विशतक’ !
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी करोनाचे ‘द्विशतक’ !

आठ रुग्णांचा मृत्यू : एकूण रुग्णसंख्या पाच हजारांवर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे द्विशतक झाले. बुधवारी जिल्हाभरात एकूण 207 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले. आतापर्यंत पॉझीटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 5010 इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पॉझीटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 22, ग्रामीण 7, भुसावळ 8, अमळनेर 39, चोपडा 18, पाचोरा 10, भडगाव 1, धरणगाव 23, यावल 3, एरंडोल 18, जामनेर 1, रावेर 30, पारोळा 1, चाळीसगाव 3, मुक्ताईनगर 16, बोदवड 6 तर परजिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी बुधवारी एकूण 115 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 2983 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1726 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 214 अत्यवस्थ आहेत. बुधवारी एकूण 8 कोरोनापॉझीटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून 4 रुग्णांचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर 4 रुग्णांचा मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील 60 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यातील 60 वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील 74 वर्षीय पुरुष, धरणगाव तालुक्यातील 73 वर्षीय पुरुष, भडगाव तालुक्यातील 70 वर्षीय महिला, मुक्ताईनगर तालुक्यातील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com