चाळीसगावात प्रथमच आढळले २३ करोना पॉझिटिव्ह रूग्ण
जळगाव

चाळीसगावात प्रथमच आढळले २३ करोना पॉझिटिव्ह रूग्ण

५१ जणांचे स्वॅब येणे बाकी

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी

शहरात पहिल्यादाच सर्वाधीक २३ जण करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सिंधी कॉलनी, सप्तशृंगी नगर, जहागीरदार वाडी, धुळे रोड, जयहिंद कॉलनी, चौधरी वाडा आदी भागातील रुग्ण आहेत.

तर एका खाजगी हॉस्पीटलमधील तीन ते चार कर्मचारी देखील करोना बाधित झाल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या ८५ स्वॅब पैकी २३ जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर उर्वरित निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.

शहरात पहिल्यांदाच २३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. २३ जणांच्या संपर्कात आलेल्याचा शोध घेवून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com