शालेय पोषण आहार प्रकरणी शानभाग विद्यालयात तब्बल पाच तास चौकशी

शिक्षकांचे जबाब नोंदविण्यास मुख्याध्यापिकांची असमर्थता

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब.गो.शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समितीने बुधवारी तब्बल 5 तास चौकशी केली. यात समितीने 10 वर्षाचे पोषण आहाराचे दप्तरची मागणी केली होती.

त्यापैकी शाळा प्रशासनाकडून दोन वर्षाचे दप्तर दाखविण्यात आले. तसेच समितीने मुख्यध्यापकासह उपस्थित शिक्षकांचे जवाब नोंदविण्याचे सांगितले असता मुख्यध्यापकांनी असमर्थता दाखविली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

शानभाग विद्यालयातील शालेय पोषण आहाराची रविंद्र शिंदे यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणासाठी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समितीचे सदस्य गटशिक्षणाधिकारी सतिष चौधरी,लेखा अधिकारी शामकांत न्हाळदे,शापोआ अधिक्षक अजित तडवी यांच्या समितीने आज दुसर्‍यांचा शाळेत जावून चौकशी केली आहे.यावेळी तक्रारदार रविंद्र शिंदे उपस्थित होते.

समितीने या पुर्वी शाळेकडे पोषण आहाराच्या दहा वर्षाच्या दप्तरची मागणी केली होती. मात्र शाळा प्रशासनाकडून दोन वर्षाचे दप्तर समितीला सादर करण्यात आले. दरम्यान समितीने मुख्याध्यापीका अंजली महाजन यांच्यासह उपस्थित कर्मचार्‍यांचे जवाब नोंदविण्याचे सांगितल्यावर मुख्यध्यापकांनी त्यास असमर्थता दाखविली.

तसेच शाळा प्रशासनाने प्रथमच समितीसमोर या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.परंतु समितीने या चौकशीला शासनाकडून स्थगिती आली नाही.न्यायलयाची देखील स्थगिती नसल्याचे स्पष्ट केले. उर्वरेीत कागदपत्रासाठी समिती पुन्हा दि.22 जुलै रोजी शाळेत जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com