जळगाव - Jalgaon

कामात हलगर्जीपणा, परस्पर रक्कम काढणे व खर्च करणे , कामात दिरंगाई करणे याचा ठपका ठेवत जिल्हयातील पाच ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनीं निलंबित केले आहे.

यावल येथील 2 तर अमळनेर तालुक्यात तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तर पारोळा तालुक्यातील ढेकू खुर्द येथील एक असे जिल्ह्यातून पाच ग्रामसेवकांना कामातील हलगर्जीपणा, परस्पर रक्कम काढणे व खर्च करणे , कामात दिरंगाई करणे यासंदर्भात तालुका स्तरावरून अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्यात आला होता.

या अहवालावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी पाच ग्रामसेवकांना निलंबित केले आहे.

यात यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील ग्रामसेवक मकरंद सुधाकर सैंदाणे, किनगाव खुर्द येथील ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे , अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक येथील ग्रामसेवक शेखर जगन्नाथ पाटील, सारबेट बयेथील ग्रामसेवक रवींद्र पवार तर पारोळा तालुक्यातील ढेकू खुर्द चे ग्रामसेवक जितेंद्र देशमुख यांचा समावेश आहे.