महिलेच्या आत्महत्याप्रकरणी कॉन्स्टेबल पतीसह पाच जणांना अटक
जळगाव

महिलेच्या आत्महत्याप्रकरणी कॉन्स्टेबल पतीसह पाच जणांना अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

आशाबाबानगरातील महिलेच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या पोलीस कॉन्स्टेबल पतीसह पाच जण पोलिसांना शरण आले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली.

आशाबाबानगरातील सोनाली नरेंद्र सोनवणे या महिलेने 10 जुलै रोजी जाळून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेचा पती व पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र भगवान सोनवणे, सासू प्रमिलाबाई सोनवणे, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश सोनवणे, दिराणी स्वाती योगेश सोनवणे आणि नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 13 जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यात नंतर हुंडाबळी व खुनाचे कलम देखील वाढवण्यात आले आहे. याप्रकरणी नणंद सरला देशमुख वगळता इतर संशयित पाच आरोपी पोलिसांना शरण आले.

या महिलेचा पती नरेंद्र सोनवणे हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहे. याप्रकरणी त्यास काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com