चौघुले प्लॉट गोळीबार प्रकरणी पाच जणांना अटक

चौघुले प्लॉट गोळीबार प्रकरणी पाच जणांना अटक

दोन दिवसांची पोलीस कोठडी; इतर संशयित फरार

जळगाव - Jalgaon

व्हाॅट्सअपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याने चौगुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशीरा याप्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध शनी पेठ पोलीस ठाण्यात दंगल व आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सारवान गटाच्या राम उर्फ सोनू भगवान सारवान, निलेश नरेश हंसकर, लखन भगवान सारवान, सनी राजू मिलांदे सर्व रा. गुरुनानक नगर, व पंकज भानुदास चौधरी रा. चौघुले प्लॉट या पाच जणांना रात्रीतून अटक करण्यात आली आहे. आज सोमवारी सर्वांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल होतेवेळी पोलीस अधीक्षक शनिपेठ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. दोघांच्या फिर्याद घेतल्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षकांनी तपासून पाहिल्या. यानंतर रात्री उशीरा दोन्ही गटाच्या विरोधात आपसात तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर शनिपेठ पोलिसांनी सोनू सारवान, निलेश हंसकर, लखन सारवान, सनी मिलांदे व पंकज चौधरी यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाचही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com