पिंप्राळ्यात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाणार

महापौर जयश्री महाजन : अग्निशमन सैनिक दिनानिमित्त कर्मचार्‍यांचा सत्कार
पिंप्राळ्यात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाणार

जळगाव - कोणत्याही आपत्ती निवारणप्रसंगी अतिशय धैर्याने व प्रशिक्षणाने आगीपासून जीव व मालमत्ता वाचविणारे तसेच यापासून होणार्‍या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे अग्निशमन सेवेचे सेवेकरी हे खर्‍या अर्थाने ‘सैनिक’च असतात. त्या अनुषंगाने शहरातील वाढत्या नागरी वस्त्यांचे क्षेत्र लक्षात घेता पिंप्राळा परिसरात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल, असे आश्वासन महापौर सौ.जयश्री महाजन यांनी आज दिले.

जागतिक अग्निशमन सैनिक दिनानिमित्त गोलाणी व्यापारी संकुलातील तळमजल्यातील महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या केंद्रात जाऊन केंद्रप्रमुख शशी बारी यांच्यासह विश्वजित गरडे, गिरीश खडके, तेजस जोशी, सय्यद नासीर अली, प्रकाश चव्हाण, सोपान जाधव, गंगाधर कोळी, राजेश चौधरी, दिवाण इंगळे, युसूफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे, संतोष तायडे आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी त्या बोलत होत्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com