बहिणाबाई उद्यानाजवळ टपरीला आग; 50 हजारांचे नुकसान

बहिणाबाई उद्यानाजवळ टपरीला आग; 50 हजारांचे नुकसान

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ महामार्गाला लागून असलेल्या पत्र्याच्या टपरीला सोमवारी रात्री पावणे आठ वाजता अचानक आग लागली. यात टपरी जळून खाक झाली असून 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टपरीत रघुनाथ निकम यांचे कार्यालय होते. सोमवारी या भागात नेहमीसारखी वर्दळ सुरू होती, पावणे आठ वाजेच्या सुमारास अचानक टपरीला आग लागली.

रस्त्याने जाणार्‍या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन बंबाने घटनास्थळ गाठले.

फायरमन भगवान पाटील, वसंत कोळी, हिरामण बाविस्कर,सरदार पाटील व जगदीश साळुंखे यांनी आग विझवली. दरम्यान आगीत कोणालाही इजा झालेली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com