सिगारेटसह ५२ लाखांचा खाद्यपदार्थांचा माल खाक

शिवाजीनगरातील गोडावूनला आग
 सिगारेटसह ५२ लाखांचा खाद्यपदार्थांचा माल खाक

जळगाव - Jalgaon

शहरातील शिवाजीनगर येथे महापालिका आयुक्तांच्या बंगल्या शेजारी असलेल्या सिगारेट तसेच बिस्कीट, वेफर्स, नुडल्स अशा खाद्यपदार्थ असलेल्या गोडावूनला काल शनिवारी सायंकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडावूनमधील ४२ लाख रुपयांचे आटीसी, एटीडी कंपनीच्या सिगारेट व १० लाखांखे बिस्कीट, वेफर्स, नुडल्स, रेडीमिक्स असे एकूण ५२ लाखांचा माल खाक झाला आहे. याप्रकरणी आज रविवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजूू वय ४६ रा. जैन पाईप फॅक्टरी, निमखेडी रोड यांची शिवाजीनगर येथील महापालिका आयुक्त यांच्या बंगल्या शेजारी गोडावून आहे. या गोडावूनमध्ये ते सिगारेटसह खाद्यपदार्थांचा माल ठेवतात. या गोडावूनला १५ मे रोजी सायंकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीबाबत याच परिसरात राहत असलेल्या अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजू यांच्या बहिणी निर्मला हिस माहिती मिळाली. तिने आगीच्या घटनेबाबत भाऊ अरुणकुमार जाजू यास फोनवरुन कळविले. अरुणकुमार जाजू घटनास्थळी पोहचले असात, आगीत गोडावूनमधील ४२ लाखांच्या सिगारेट व १० लाखांचे बिस्कीटसह इतर खाद्यपदार्थ असा एकूण ५२ लाखांचा माल खाक झाला आहे. याप्रकरणी अरुणकुमार जाजू यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रहिवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्या अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com