नवीपेठेतील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये आग

नवीपेठेतील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये आग

एटीएम सुरक्षित, एसीसह वायरिंग खाक

जळगाव - Jalgaon :

शहरातील नवीपेठेतील गणपती मंदिरासमोर असलेल्या कॅनरा बॅकेच्या एटीएममध्ये आज बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

वेळीच अग्निशमन बंबाने पोहचून ही आग आटोक्यात आणली. या आगीत मूळ एटीएममशीन सुरक्षित असून एसी, वायरिंग, सीसीटीव्ही कंट्रोल बॉक्स व वायरिंग इत्यादी वस्तू खाक झाल्या आहेत.

एसीमधील शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती कँनरा बँकेचे व्यवस्थापक अमोल पाटील यांनी बोलतांना दिली आहे.

नवीपेठेतील गणपती मंदिरासमोर कॅनरा बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये आज दुपारी १ वाजेच्या सुमारास आग लागली.

एटीएमपासून काही अंतरावरच बँकेचे मुख्य कार्यालय आहे. मात्र आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे सुटी असल्याने ते बंद होते.

आगीची माहिती मिळाल्यानंतर बँकेेचे अधिकारी अभिजित पळसकर यांनी घटनास्थळ गाठले. व महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन केला.

यानंतर मिळालेल्या माहितीनुसार बँकेचे शाखा व्यवस्थापक मृणाल गुणमुळे, व्यवस्थापक अमोल पाटील, अधिकारी वितीन कुमार, प्रिती डुंगडुंग यांनीही घटनास्थळ गाठले.

अग्निशमन बंबानेही घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा करत आग विझविली. वेळीच पोहचलेल्या अग्निशमन बंबामुळे आग आटोक्यात येवून एटीएममशीन सुरक्षित राहिले.

या आगीत एटीएममधील एसी, वायरिंग, सीसीटीव्ही कंट्रोल बॉक्स अशा वस्तू खाक झाल्या. याप्रकरणी शहर पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com