अखेर वॉररुममधील टोल फ्री क्रमांक कार्यान्वित

कोरोनाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मनपात २४ तास सेवा
अखेर वॉररुममधील टोल फ्री क्रमांक कार्यान्वित

जळगाव - Jalgaon

कोरोनाबाधित रुग्णांना मनपाच्या कोविड केअरमधील बेड उपलब्धतेची माहिती जाणून घेण्यासाठी मनपात वॉररुम तयार करण्यात आली आहे. मात्र मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या १८००२३३८५१० टोल फ्री क्रमांकावर प्रतिसाद मिळत नसल्याचे वृत्त दैनिक देशदूतने प्रसिध्द करताच मनपा यंत्रणेला जाग आली. अखेर तांत्रिक अडचणीमुळे बंद असलेला टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. याबाबत देशदूतने टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती जाणून खात्री केली.दरम्यान,वॉररुममध्ये कोरोनाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मनपात २४ तास सेवा उपलब्ध असणार आहे.

मनपात सुरु करण्यात आलेल्या वॉररुममधील टोल फ्री क्रमांकाला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्या तात्काळ दूर करण्यात आल्या असून ही सेवा आता पूर्ववत झाली आहे.
-शाम गोसावी, उपायुक्त,मनपा,जळगाव.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे शहरासह जिल्ह्यात बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने हाल होत आहे. त्यामुळे मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील बेड उपलब्धतेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मनपाच्या आठव्या मजल्यावरील आरोग्य विभागात वॉररुम सुरु करण्यात आली आली आहे. नागरिकांनी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वॉररुममध्ये शिक्षकांची नियुक्ती
कोरोनाबाधतची माहिती जाणून घेण्यासाठी मनपात वॉररुम सुरु करण्यात आली आहे. ही सेवा २४ उपलब्ध असून माहिती देण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com