BHR प्रकरणात अखेर सुनील झंवरला नाशिकमधून अटक

तब्बल नऊ महिन्यांपासून पोलिसांना देत होता चकवा
BHR प्रकरणात अखेर सुनील झंवरला नाशिकमधून अटक

जळगाव :- jalgaon

पुणे येथे बीएचआर (bhr) घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तब्बल नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य संशयित सुनील झंवरच्या मंगळवारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने नाशिकमधून (nashik) मुसक्या आवळल्या आहेत.

BHR प्रकरणात अखेर सुनील झंवरला नाशिकमधून अटक
तीन कोटीचे सोने लुटणाऱ्या नाशिकच्या सूत्रधारास अटक

पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात नोव्हेंबर २०२० मध्ये बीएचआर (bhr) घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे . गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित सुनील झंवर फरार होता

राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशासक जितेंद्र कंडारेला इंदूर इथून जून महिन्यात अटक करण्यात आली होती. बीएचआर पतसंस्थेची मालमत्ता कमी दरात आपल्या हितचिंतकांना देऊन त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय आहे. यामध्ये प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचं मानलं जात आहे

काय आहे प्रकरण?

बीएचआर म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आला होता. देशभरात सात राज्यात या संस्थेच्या 264 शाखा असून 28000 हजार ठेवीदारांच्या 1100 कोटी रुपयांच्या ठेवी यामध्ये अडकून पडल्या आहेत. मुदत संपल्यावर देखील ठेवींच्या रकमा परत मिळत नसल्याने हा घोटाळा 2015 ला खऱ्या अर्थाने समोर आला होता. यावेळी भाईचंद हिराचंद संस्थेच्या तेरा संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

याच काळात ठेवीदारांच्या ठेवी त्यांना परत करता याव्या यासाठी शासनाने या पतसंस्थेवर जितेंद्र कांडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. या अवसायकने भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या मालमत्ता लिलावात विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता या मालमत्ता काही ठराविक लोकानांच अतिशय कमी किंमतीत मातीमोल भावात विकल्या होत्या. या मालमत्ता विक्रीबाबतही सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार करुन बनावट दस्ताऐवज बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवाय ठेवीदारांच्या ठेवी परत करताना त्यांच्या मूळ रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन उर्वरित रक्कमेचा अपहार करण्यात आल्याच्या तक्रारी ठेवीदारांकडून करण्यात येत होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com