जळगाव - Jalgaon

इमारतीच्या स्लॅबसाठी लागणारे १ लाख ७० हजार ४०० रूपये किंमतीच्या भाड्याने आणलेल्या लोखंडी प्लेटा सोपान देव नगरातून चोरून नेल्याची घटना आज समोर आली आहे.

पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बांधकाम ठेकेदारीचे काम करणारे वैभव कैलासराव साळुंखे (वय-२६) रा. बजरंग बोगद्याजवळ, श्रीकृष्ण कॉलनी यांनी सोपान देव नगरात बांधकाम करण्याचे काम घेतले आहे. स्लॅब टाकण्यासाठी त्यांनी भाड्याने १ लाख ७० हजार ४०० रूपये किंमतीच्या १४२ लोखंडी प्लेटा सोपान देव नगरात ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता साईटवर आणल्या. त्यानंतर ते घरी निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १४२ लोखंडी प्लेटा चोरून नेल्याचे उघडकीला आले.

यासंदर्भात ओळखीच्या नागरीकांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काहीच माहिती मिळाली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.