दारु प्यायला २० रुपये न दिल्याने कैचीने केले पोटावर वार

पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील दारुच्या अड्डयासमोर घटना
दारु प्यायला २० रुपये न दिल्याने कैचीने केले पोटावर वार

जळगाव - Jalgaon

दारु पिण्यासाठी २० रुपये न दिल्याने मद्यपीने प्रशांत पंडीतराव साबळे वय २८ रा. सुप्रिम कॉलनी या वाहनचालक तरुणाच्या पोटात लोखंडी कैचीने वार केल्याची गंभीर घटना २२ एप्रिल रोजी पंचमुखी हनुमान मंदिर पसिरातील रामदेव बाबा मंदिराच्या जवळील साहेबरावच्या दारुच्या अड्डयासमोर घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात मदय्पी बबल्या शेंड्या (पूर्ण नाव माहिती नाही रा. श्रीकृष्ण नगर) याच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत साबळे हा तरुण २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रामदेव बाबा मंदिर पसिरातून पायी जात होता. यावेळी साहेबरावच्या दारुच्या अड्डयासमोर मद्यपी बबल्या शेंड्या याने प्रशांतकडे दारु पिण्यासाठी २० रुपये मागितले.

प्रशांत याने पैसे देण्यास नकार दिला असता, याचा राग आल्याने बबल्याने त्याच्या खिशातील लोखंडी कैची काढून प्रशांतच्या पोटावर लोखंडी कैचीने दोनवेळा वार केले. यात प्रशांत जखमी झाला. असे प्रशांत याने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com