गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेला गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शनिपेठ पोलीस ठाण्यात सरकारतर्फे पोलीस कर्मचार्‍याने दिली फिर्याद
गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेला गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon

शहरातील काट्या फाईल येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांच्या २५ मे रोजी काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेला गर्दी जमविल्याप्रकरणी त्यांची मुले एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, फैजल अब्दुल गफ्फार मलिक तिघे रा. काट्याफाईल शनिपेठ यांच्यासह इतरांविरोधात विरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात काल बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गफ्फार मलिक यांचे २४ मे रोजी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दुसर्‍या दिवशी दुपारी त्यांची अंत्ययात्रा शनीपेठेतील बैतूल मलिक नावाच्या बिल्डींगपासून काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत राहत्या घरापासून तर इदगाह मैदानापर्यंत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता.

गर्दी न करता कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी लागू केलेले नियम पाळून अंत्ययात्रा काढण्याबाबत गफ्फार मलिक यांच्या मुलांना अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह, तसेच शनिपेठचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांनी वेळोवेळी सुचना केल्या होत्या. दुसर्‍या दिवशीही अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यंानंी त्यांनी पाणी अंत्ययात्रा न काढता, वाहनातून काढावा तसेच गर्दी न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. असे असतांनाही पायी अंत्ययात्रा काढण्यात आली.

तसेच हजारोंच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता. नियम हा केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर सर्वांना सारखा असावा, याप्रमाणे माहिती अधिकारी कार्यकतर्ये तसेच सामाजिक कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनीही काल बुधवारी ट्वीटरव्दारे मुख्यमंत्र्यांना तक्रार केली होती. त्यानुसार कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदी, जमावबंदी व साथरोग नियंत्रण कायदा लागू केला असतांना अंत्ययात्रेत या कायद्याचे उल्लंघन झाले आहे.

त्यामुळे याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्याचे अमलदार गिरीश दिलीप पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यावरुन काल बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मयत गफ्फार मलिक यांची मुले एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, फैजल अब्दुल गफ्फार मलिक तिघे रा. काट्याफाईल शनिपेठ यांच्यासह इतरांविरोधात भादवि कलम १८८, २६९ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१ ब प्रमाणे शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अमोल कवडे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com