जळगाव - Jalgaon

शहरातील पिंप्राळा हुडको येथे कस्तुराबाई दशरथ ब्राम्हणे (वय-७०) या वृध्देच्या घरातून सावत्र जावाई आणि नात यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी आज २२ फेब्रुवारी रोजी वृध्देच्या तक्रारीवरुन नवल बागुल व बागुल यांची मुलगी ठगूबाई दोन्ही रा.कांचननगर यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ

कस्तुराबाई दशरथ ब्राम्हणे ह्या एकत्याच राहतात. मिळेल ते काम व भिक मागून त्या आपला उदरनिर्वाह भागवितात. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कस्तुराबाई यांना भेटण्यासाठी सावत्र जावाई नवल बागुल आणि त्याची मुगली ठगुबाई हे आले.

गोड बोलून कस्तूराबाई यांना बोलण्यात गुंतवुन ठेवले. त्यात दोघांनी घराची झडती घेतली. घरातील लोखंडी पेटी मधील ५ हजार रूपये रोख आणि ८ हजार रूपये किंमतीची २०० ग्रॅम वजनाची चांदीची लक्ष्मीची मुर्ती, ९ हजार रूपये किंमतीचे ४ ग्रॅम सोन्याचे टॉप्स असा एकुण २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल काढून घेतला. पुन्हा पेटीला कुलूप लावून चावी कांद्याच्या टोपलीत टाकून दिली.

कस्तुराबाई यांनी दोघांना कसे येणे झाले असे विचारले असता, आम्ही तुला फक्त बघायला आलो होतो, तुझे काही एक घेणार नाही असे दोघांनी सांगितले. थोडा वेळ थांबून दोघे निघून गेले. दोघे गेल्यावर कस्तुराबाई यांनी पेटी उघडून पाहणी केली असता त्यांना पैसे व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी कस्तुराबाई ब्राम्हणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आज सोमवारी सकाळी सावत्र जावई नवल बागुल व मुलगी ठगूबाई दोन्ही रा.कांचननगर यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनमोल पटेल हे करीत आहेत.