पोलीस पाटलास मारहाण करणे पडले महागात

नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस पाटलास मारहाण करणे पडले महागात

जळगाव - Jalgaon

तालुक्यातील तरसोद येथील पोलीस पाटील गोकुळ नथ्थू शिरूड यांना काल दि.१८ रोजी एकाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याकामी पोलीस पाटील गोकुळ शिरूड हे कर्तव्यावर असताना येथील साहेबराव राजू पवार (वय ३०) या तरूणाने पोलीस पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने कलम ३५३ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.उ.नि.राजेंद्र साळुंखे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com